Tuesday, July 02, 2013

त्रिंगलवाडी किल्ला (इगतपुरी)






















त्रिंगलवाडी किल्ला (इगतपुरी)

किल्ल्याचे वर्णन आणि इतिहास :-

प्रशस्त प्रवेशद्वार, प्रवेशद्वाराच्या चौकटीवर कोरीव काम, द्वाराच्या दोन्ही अंगास जाळीदार अवाक्ष, गुहेच्या छतावर वर्तुळात कोरलेली मानवाकृती, गुहेच्या गाभाऱ्यात भगवान बुद्धांची ध्यानस्थ मूतीर्... हे सारं ऐतिहासिक वर्णन आहे, त्रिंगलवाडी किल्ल्याचं. किल्ल्याच्या पायथ्याशी दहाव्या शतकात खोदलेली जैनधमीर्य गुहा सध्या पांडवलेणी म्हणून ओळखली जाते. या गुहेच्या अंगावर वसला आहे रांगडा त्रिंगलवाडीचा किल्ला.

इगतपुरी-नाशिक महामार्गावर इगतपुरीच्या पुढे चार किमी अंतरावर टाकेघोटी गाव आहे. इथून सात किमीवर त्रिंगलवाडी गाव आहे. या गावापासून एक पक्का रस्ता त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. त्रिंगलवाडी गाव ते किल्ल्याचा पायथा हे अंतर तीन किमी आहे. या वाटेच्या डाव्या हाताला प्रशस्त त्रिंगलवाडी जलाशय आहे. गावातून चालत जाणाऱ्यांनी जलाशयाच्या भिंतीवरून जाता येतं. जलाशयाच्या पार्श्वभूमीवर त्रिंगलवाडीचा किल्ला आ वासून उभा असलेला दिसतो. पायथ्याच्या ठाकर वस्तीत पोहोचल्यानंतर एक छोटी पायवाट किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गुहेजवळ येते. चारही बाजूनी डोंगररांगनी वेढलेलं हे ठिकाण पाहताना डोळ्याचं पारण फिटतं, असंच म्हणावं लागेल.

त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही गुहा दहाव्या शतकात निर्माण केेलेली आहे. सुरेख नक्षीदार अशा या गुहेत थोडी विश्रांती घ्यावी. लेण्यांचा आतील भाग काही वर्षांपूवीर् संपूर्ण चिखलाने भरलेला होता. पण २००८ मध्ये पुरातत्व विभागाने याची साफसफाई केल्याने ही गुहा पाहण्यासाठी आणि विश्रांतीलायक झाली आहे. गुहेच्या डाव्या हाताने गडावर जाण्यासाठी पायवाट आहे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर गडाच्या माचीवर पोहोचता येतं. माचीवर एक छोटेखानी झोपडी आहे. थोडी विश्रांती घेत बाजूचा सुंदर परिसर न्याहाळता येतो. इथूनच उजव्या हाताने गडमाथ्यावर जाणारी सोंड आहे. या सोंडेच्या वाटेने चालत जाताना थोडे जपूनच. या वाटेवर डाव्या हाताला दगडाला शेंदूर लावलेले स्थानिक देवस्थान आहे. इथून डाव्या हाताने ढासळेल्या तटातून एक वाट वर गेलेली दिसते. इथे कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या आता फुटलेल्या अवस्थेत आहे. इथेच डाव्या हाताला कातळात खोदलेला पाण्याचा टाका आहे. थोडं पुढे गेल्यावर गडाचं ढासळलेलं प्रवेशद्वार दिसतं.

प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करताच गडाच्या मध्यभागी दक्षिणोत्तर पसरलेली छोटी टेकडी पसरलेली दिसते. डाव्या हाताला किल्लेदाराचा भग्नावस्थेतील वाड्याचा चौथारा दिसतो. याच वाटेने पुढे गेल्यावर टेकडीच्या मध्यभागी गडमाथ्यावर जाणारी वाट आहे. याच वाटेवर पुढे डाव्या हाताला दोन प्रशस्त गुहा आहेत. काही काळापूवीर् या गुहा स्वच्छ होत्या. पण, सध्या गुरांचा वावर या गुहेत असल्याने इथे मुक्काम करता येत नाही. गडाच्या उत्तर टोकावर एक छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरात गणपती, शंकर-पावतीर् यांच्या शेंदुर लावलेल्या मूतीर् आहेत. या वाटेने गडाच्या सवोर्च्च भागावर जाता येतं. गडमाथ्यावरून सह्यादीची अतिशय सुंदर रांग दिसते. इथून त्रिंगलवाडीचा जलाशय, दक्षिणेला इगतपुरी, वैतरणा खोरे, त्र्यंबकरांग, कावनाई, मोरधन असा संपूर्ण प्रदेश न्याहाळता येतो.

कडा आणि टेकडीच्या मधून गेलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. तर द्वारावर चंद-सूर्याच्या कोरलेल्या प्रतिमा आहे. इथून उजव्या हाताला बारा फूट उंच मारुतीरायाची मूतीर् आहे. त्रिंगलवाडीची गडफेरी पूर्ण करण्यासाठी साधारण दोन तास पुरेसे होतात. त्रिंगलवाडी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला, याची इतिहासात नोंद नाही. पण १६८८ च्या अखेरीस मोघलांनी फितुरी करून हा किल्ला मराठ्यांकडून घेतला.

1 comment: