सुगंधी फुलांची दरवळ आसमन्तात पसरली माझीही मनस्थिति तेव्हा धुंद श्वासात ओसरली |
शब्द वाचताना शब्दान्च्या रूपात मी तुझा प्रतिमेला पाहतो शब्द शब्दातुन अर्थ साठवुन माझाच् मी न राहातो |
शब्दांशी खेळताना नेहमीच जपून खेळावे ओंजळीत घेताना त्याना जपून धरावे सांडू नये याची दक्षता घ्यावी आकाश आणि धरती शब्दान्निच एकत्र मिळावी |
बहर आला सृष्टीला बहर आला निसर्गाला तोच वाहणारा निर्मळ झरा पाहून कोन्दलेला आवाज मुक्त झाला |
तुला नव नाही म्हणूनच विश्वास माझा दृढ आहे तुझ्या मनात एक हलकिशी प्रेमाला जिंकण्याची लुड्बुड आहे |
त्या आदळनार्या लाटा माझ्यासाठी जागतच नाहीत कितीही प्रयत्न केले तरी तिथून पाय निघतच नाहीत ____________ |
जन्मोजन्मिच्या या नात्यात रंग मी भरला आहे तुझ्या या दूराव्याने गंध पुरून उरला आहे |
शब्द सांडले तरी त्याना आनंदात वेचावे पुन्हा वाया जाऊ नये म्हणून एकत्रित रचावे त्यात असतो रंग भावनांचा ओला कधी कधी प्रेम तर कधी संघर्षाचा ओलावा |
बहरलेल्या मैत्रीचे आपल्या गोंडस असे स्वरुप रंगात रंग मिसळुनी देऊ नवीन रूप |
निराश मनाला सावरतात ते शब्द अहंकारी मनाला शमवितात ते शब्द कितीही गटांगळ्या खाल्ल्या तरी पुन्हा जागेवर येणारे असतात ते शब्द |
शब्दाना कधी आसवांत नहावे भिजतात जेव्हा शब्द त्यांच्या आधाराला जावे जीवन शून्य असते शब्दाविना यातच तुम्ही शब्दाची महती जाणा |
मी नक्कीच जिन्केन उद्या याची खात्री मज आहे प्रयत्न आणि संघर्ष यांचा माझ्यावर नेहमीच साज आहे |
प्रत्येक पाऊल उचलताना मी माझ्यात मला जाणतो जीवन काय शिकविते त्यातूनच उत्साह आणतो |
माझ्यासमवेत जगताना तू किती भावुक होतोस सर्व काही मलाच देऊन तू रिकामा कसा राहतोस |
सर्वजण एकत्र आल्यावर कामे पण लगेच होतात एकमेकांच्या हातात हात घालून चुटकिसरशी निघून जातात |
प्रेम आणि आपुलकी हे दोन्ही नात्याची देतात साक्ष त्यात असतो विश्वास नेहमीच राहावे लागते दक्ष |
सुख दुखाचा विचार करताना मी तुलाच समोर पाहिले माझे संपूर्ण जीवनच तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले |
मी तर नेहमीच तुला होकारातच मानतो वेडापिसा होऊन तुझ्यासाठी तुझे मन जाणतो |
जेव्हा माझे दुख पाहिलेस विश्वास मला मैत्रीचा तेव्हाच कळला नजर वळली तुझ्याकडे तेव्हा तुझ्या नयनी अश्रू तरळला |
तुझी न माझी शुद्ध मैत्री कोणीही सामान्य जानेल लिहायला गेलो मैत्रीच्या आठवणी तरी एक पूर्ण कादंबरी बनेल |
बोध घेतला मी फुलपाखराकडून त्याचे जीवन असते छोटे खूप आनंदाने उडत असलेले बघून मला पण येतो नेहमीच जगण्यास हुरूप |
अशी उत्साही मने आमची नेहमी नेहमीच होत नाहीत जोपर्यंत आपल्यासारखे मार्गदर्शक आम्हाला लाभत नाहीत |
ताल लय सूर नाद मैत्रीत माझ्या घुमला निशिगंध व गुलाब दारातला एकाच वेळी उमलला |
जीत आणि हार दोन्ही सुख दुख जीवनात आणतात चिकटुन असतात एकमेकाला पण एकमेकांना विरोधक मानतात |
तोच रूसवितो तोच फुगवितो आपण मात्र निमित्त असतो विधिलिखित असतो जीवनाचा पाढा बाकी सर्व तोच लिहीत असतो |
स्वप्न होते मोठे जीवनाचे अगोदरच आल्या लाटा नियतीतच लिहिले होते नव्हत्या त्या माझ्या वाटा |
सहन कर हेच सांगणे काहीच करू शकत नाही नशिबात आलेला खेळ कुणीच सावरू शकत नाही |
शब्दांचा अर्थ कोणीही मूकपणे सुद्धा जाणतो कुठलेही भावबंध न ठेवता मी त्यांना एका साच्यात आणतो |
याच अशा काव्यपुष्पाची मला नेहमीच गरज भासते कवितेत जान आणण्यासाठी अशा वेलींची नेहमीच आस असते |
नाव काहीही असुदे नात्याचे आपल्या जीवनात नेहमीच फुलत राहील निर्मळ साथ मिळून एकमेकांची मनात नेहमीच झुलत राहील |
जेव्हा मनातून वाढतो नात्यानात्यातील गुंता कोडी सुटतात आपोआप जास्त खोलातिल न जाणता |
आनंदाच्या वेळी नेहमीच मी असाच मागे राहतो प्रत्येक वेळी असाच पश्चाताप होऊन दुखात जीव राहतो |
सागराच्या लाटान्ना जेव्हा दुरुनच मी पाहतो नाते त्यांचे सागराशी तन्मयतेने मी जाणतो |
आज माझे मला शोधणेही कठीण होऊन बसले चुक झाली माझीच जेव्हा मी प्रतिकार न करताच हाल सोसले |
मन हळव होत माझ हिरवा निसर्ग पाहताना बागडतो मी स्वछन्दी हवेत हिरवी पिके डोलताना |
हे निसर्गाचे दान सर्वांच्या नेहमीच पडते पदरात भेद नसतोच मुळी ह्या निसर्गाच्या कधी उदरात |
निसर्गाची शिकवण आपल्याला खूपच असते न्यारी म्हणून तर निसर्गात मुक्त कंठाने द्याविशी वाटते जोराची आरोळी |
फुलांची कविता
No comments:
Post a Comment