Friday, June 07, 2013

बितनगड

बितनगड
Photo: बितनगड
( माहिती संकलन - अमोल तावरे, पेज - फक़्त राजे)

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग  डोंगररांग: कळसूबाई

किल्ल्याची ऊंची :  4000जिल्हा : नाशिक  श्रेणी : मध्यम
बितनगड हा किल्ला कळसूबाईच्या डोंगर रांगेत पुर्वेला आहे. ह्या पूर्व रांगेत आणखीन असणारे किल्ले म्हणजे औंढा, पट्टा, आड आणि म्हसोबाचा डोंगर. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो.

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर एक गुहा आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात.
पोहोचण्याच्या वाटा :
घोटी - भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. या गावातून एकदरा फाटा अंदाजे १२ किमी अंतरावर आहे. एकदरा फाट्यापासून बितनगडाच्या पायथ्याचे बितनवाडी गाव ६ किमीवर आहे.
गडाच्या पायथ्याशी बितंगवाडी हे गाव आहे. या गावातून किल्ल्याकडे जाता येत. शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. किल्ला चढायला कठीण नाही, पण खडकात खोदलेल्या पायर्‍या चढताना नीट चढून जाण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोरी (रोप) असू द्यावी. पावसाळ्यात शेवाळ्यामुळे पायर्‍या निसरड्या होऊ शकतात. नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. बितंगवाडीत राहता येतं. टाकेद (बितंगवाडी पासून सुमारे १५ किलोमीटर) या गावातील जटायूच्या देवळात राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बितंगवाडीतून १ तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.
----------------------------------------------------
गड किल्ल्यांच्या माहितीचे एक परिपूर्ण पेज म्हणजे ....
फक़्त राजे  फक़्त राजे   फक़्त राजे
अकोले तालुक्यातील कळसूबाई गिरीदुर्ग डोंगररांग आपणा सर्वाना  परिचित  आहे. या डोंगर रांगेत सुमारे

  4000 फुट उंची असणारा हा बितनगड मध्यम श्रेणीचा आहे.
बितनगड हा किल्ला कळसूबाईच्या डोंगर रांगेत पुर्वेला आहे. ह्या पूर्व रांगेत आणखीन असणारे किल्ले म्हणजे औंढा, पट्टा, आड आणि म्हसोबाचा डोंगर. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो.

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर एक गुहा आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात.
पोहोचण्याच्या वाटा :
घोटी - भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. या गावातून एकदरा फाटा अंदाजे १२ किमी अंतरावर आहे. एकदरा फाट्यापासून बितनगडाच्या पायथ्याचे बितनवाडी गाव ६ किमीवर आहे.
गडाच्या पायथ्याशी बितंगवाडी हे गाव आहे. या गावातून किल्ल्याकडे जाता येत. शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. किल्ला चढायला कठीण नाही, पण खडकात खोदलेल्या पायर्‍या चढताना नीट चढून जाण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोरी (रोप) असू द्यावी. पावसाळ्यात शेवाळ्यामुळे पायर्‍या निसरड्या होऊ शकतात. नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. बितंगवाडीत राहता येतं. टाकेद (बितंगवाडी पासून सुमारे १५ किलोमीटर) या गावातील जटायूच्या देवळात राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बितंगवाडीतून १ तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.

No comments:

Post a Comment