Saturday, November 23, 2013

शिवदीपोत्सव, पट्टाकिल्ला


















पट्टाकिल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात झाले. नंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. इ.स. १६२७ मध्ये मुगलांनी किल्ला जिंकला.

इ.स. १६७१ मध्ये पट्टाकिल्ला मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जिंकला व स्वराज्यात सामील झाला.

इ.स. १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. सोनेनाणे, जडजवाहिर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. दरम्यान, महाराज सोनेनाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनिती निश्चित करण्यात आली. निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज नगर-नाशिक जिल्ह्य़ांच्या हद्दीवर असणा-या अकोले तालुक्यातील पट्टाकिल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नामांतर नंतर ‘विश्रामगड’ असे पडले. या गडावर महाराज विश्रांती घेऊन पुढे कल्याणमार्गे रायगडावर पोहोचले.

इतिहासाची ज्वलंत मशाल असणारा हा पट्टाकिल्ला म्हणजे शिवस्पंदन युवांचे दैवत....अशा या किल्ल्यावर शिवदीपोत्सव साजरा करताना सर्वांच्या चेह-यावर एक ऐतिहासिक हास्य दिसत होते.

शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती.....सह्यभ्रमंती !!!

No comments:

Post a Comment