'शिवस्पंदन युवा'ने केली चावंड किल्ले मोहीम फत्ते.....
'शिवस्पंदन युवा'ने केली चावंड किल्ले मोहीम फत्ते.....
वार रविवार, दि.२८ जुलै२०१३
सामाजिक कार्याची जाण आणि आदिवासी समाजाशी असलेले
नाते जपण्याच्या दृष्टीकोनातून चावंड, ता. जुन्नर, जि पुणे येथे सुमारे
९० विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भर पावसात
विद्यार्थ्यांसोबत आजचा दिवस व्यतीत करताना एकच म्हणावेसे वाटते ''आजि म्या
ब्रम्ह पाहिले''.... आज या किल्ले चावंड मोहिमेसाठी सुमारे ५० जण
महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले होते.... विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील
तो ओसंडून वाहणारा आनंद आज मला खूप काही शिकवून गेला...जीवनातील ख-या
आनंदाचे स्रोत तर हि मुले नाहीत ना असाच आज मी विचार करत होतो. सकाळी मनात
एक सारखा विचार येत होता कि किती जण येतील? खूप पाऊस आहे मग काही जण आपला
विचार तर नाही ना बदलणार...? पण मनात एक विश्वास होता आणि सोबत शिवाजी
महाराजांच्या विचारांची प्रेरणा होती. शेवटी प्रत्यक्षात चावंड येथे
पोहचल्यानंतर बाल गोपालांचा चमू समोर दिसताच सर्व विचार क्षणार्धात गायब
झाले आणि मग सुरु झाला तो
आनंदोत्सव.....जो आम्हा सर्वांना आयुष्याची शिदोरी असेल...आज मला वाटते
आम्ही मुलांना काहीच दिले नाही उलट त्यांच्याकडून जीवनभरासाठीचा आनंद मनात
साठवून घेतला....घेत आहे...दुपारच्या सत्रात सर्वजनाणी दुर्गभ्रमंतीसाठी
चावंड किल्ल्यावर कूच केली....गडाच्या पायथ्याकडून वर नजर टाकल्यानंतर असे
वाटत होते हा विशालकाय गड या पावसांच्या सरी कोसळत असताना किती त्रास होईल
आणि त्यातच दगडी पाय-या शेवाळामुळे निसरड्या झाल्याने खूप काळजी घ्यावी
लागणार....गडाच्या लोखंडी पाय-या सर करताना तर भीती वाटण्याऐवजी प्रत्येक
जण एक जोश दाखवत होता... आणि सर्वात प्रेरणादायी म्हणजे सोबत असणारे
सेवानिवृत्त नागपुरे काका हे पुढे होते...ती प्रेरणा कोणालाही स्वस्थ बसू
देत नव्हती....आणि विशेष म्हणजे एक ४ वर्षांचा मुलगा यश येवले हा सुधा मला
पुढे जायचेय असे म्हणत पळत होता....खरच काय प्रेरणा आहे या
गडकिल्ल्यांमध्ये हे प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरच समजते.....आणि आज आम्ही ते
अनुभवले.
आजचा ट्रेक विशेष होता त्याचे अजून एक कारण म्हणजे सोबत
एका आदिवासी हॉस्टेलमधील सुमारे १८ बालगोपाळ सोबत होते...त्यांनाही मोफत
ट्रेक घडवून आणताना खरच आनंदाच्या महासागरात आज मुक्त संचार केल्यासारखे
वाटले...
चावंड येथील काही उत्साही नागरिक आम्हाला
योग्य मार्ग दाखविण्यासाठी कमालीची धावपळ करत होते तेही एक अनुभवातीतच
होते.
एकूणच आजच्या ट्रेक आणि इव्हेंटद्वारे शिवस्पंदन
युवा
यांनी आपला ऋणानुबंध अधिकच घट्ट करत आजचा दिवस
खूप उत्साहात घालविला....
|
दैनिक गांवकरी |
No comments:
Post a Comment