Sunday, September 22, 2013

ताडोबा सफारी




ताडोबा सफारी
संत्र्यासाठी प्रसिध्द असलेल्या नागपूर शहराला गेटवे ऑफ विदर्भ म्हणूनही संबोधले जाते. नागपूर जिल्हय़ातील पर्यटनाचा विचार करायचा झाला तर नागपुरपासून 48 किलोमीटरवरील रामटेकचा उल्लेख करावा लागतो. आपल्या वनवासातील जो काही काळ रामाने विदर्भ परिसरात काढला त्या काही मोजक्या ठिकाणांपैकी रामटेक एक आहे, असे मानले जाते. येथील टेकडीवरील नरसिंह मंदिरे, त्रिवक्रमाची मूर्ती, वराह आणि भोगरामाचे मंदिर, सीतेची न्हाणी, लक्ष्मण मंदिर, नागार्जूनगुहा, अंबाळा तलाव आदी दर्शनीय स्थळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. असे सांगितले जाते की, कालिदासाने याच टेकडीवर मेघदूताची रचना केली. त्यामुळे येथे कालिदास स्मारकही उभारण्यात आले आहे. याशिवाय येथील जैन मंदिरात तीर्थंकर पार्श्वनाथाची 18 फूट उंचीची भव्य मूर्ती येथील पर्यटकांचे आकर्षण आहे. या टेकडीवर चैत्र आणि कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. त्या अंभोरा येथील त्रिवेणीसंगम, अदासा येथील गणपतीचे मंदिर, धापेवाहा येथील विठ्ठल मंदिर (विदर्भाचे पंढरपूर) तसेच येथून सुमारे 65 किलोमीटरवरील पेंच नदीकाठचे पेंच राष्ट्रीय उद्यान पर्यटनासाठी महत्त्वाची ठरतात.

No comments:

Post a Comment