हा आदिवासी बांधव माझा
by raju thokal
हा आदिवासी बांधव माझा, याची जाण जराशी राहु द्या रे ।।धृ।।
हा उंच डोंगर माझा, हा फुललेला निसर्ग माझा
ही भात शेती, वारली चित्रकला, हा बोहडा माझा
संस्कार यांचे पूजता, कुणी गरिबांशी या नडता
या मरण द्यावया, हा आदिवासी माणुस जागु द्या रे ।।
हा आदिवासी बांधव माझा, याची जाण जराशी राहु द्या रे ।।धृ।।
कातळागत जगणे आज रडले, माय भू च्या रक्षणाला
जपा ते, लागा कामाला, या आदिवासी क्रांती सुर्याला
ही राखेतील चिंगारी, आदिवासी बाणा मन मंदिरी
बिरसाच्या बलिदानाचा अर्थ, आदिवासी मशाली पेटू दया रे ।।
हा आदिवासी बांधव माझा, याची जाण जराशी राहु द्या रे ।।धृ।।
जरी अनेक आपल्या जनजाती, जरी अनेक आपल्या बोली
परी आदिवासी गर्व असू द्या, तेवत ठेवा संस्कृतीची पणती
सांगा जोहार सर्व दूर यल्गार, धर्मरक्षणा उलगुलान
हा आदिवासी समाज, इतिहास अजरामर होवू द्या रे ।।
हा आदिवासी बांधव माझा, याची जाण जराशी राहु द्या रे ।।धृ।।
©www.rajuthokal.com
"माझा आदिवासी हा संस्कृतीचा पाया ते शिरोमणि असा परिपूर्ण आहे. "
-राजू ठोकळ
No comments:
Post a Comment