मशाल
माणसाची कातडी पांघरुन
श्वापदे गावाकडे येवू लागली
विकासाच्या शहरी बातांनी
माय माझी खरेदी करू लागली
ही उन सावलीच्या खेळातली
माणसे रानफुले साधी भोळी
निसर्गाच्या अविष्कारातली
कष्टाची रुचकर यांची पोळी
नवरत्नांच्या खाणीतली
सोनपिवळी यांची शेती
जपावी साता जन्मातली
अशी यांची पवित्र नाती
संस्कारांच्या मैफिलीतली
सुरमयी पहाट हरवली
प्रगतीच्या वाटेवरली
श्वापदे गावी अवतरली
दगडखाणीवरल्या यंत्रातली
विषारी नीति स्वर्गात पसरली
मोरपिसांच्या रंगातली
जादू पैशासाठी नासवली
सुखाच्या फुलांची बरसात
कूटनितिने बरबाद केली
मी त्या विळख्यात आज
शोधी नाती अंगणातली
जीवनाच्या वाटेवरली
शपथ मी आज घेतली
श्वास माझा या नभातला
जागवेल माणूस मातितला
सदाफुलीगत हसणारी शेती
तीचाच आज मी सांगाती
ऋण तीचे फेडण्या
आदिवासी मशाल हाती
-राजू ठोकळ
www.rajuthokal.com
"आपण आपल्या समाजाची मशाल होण्याची गरज आहे.....कारण नेते अनेक झाले पण फरक काही पडला नाही."
No comments:
Post a Comment